तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर  विधानसभा निवडणुकीसाठी  मशीन सिलींग प्रक्रिया बुधवार दि. 13 नोव्हेंबर रोजी आरंभ झाली. तुळजापूर विधानसभा मतदार संघासाठी 410 वोटींग मशीन लागणार आहे. तर 80 मशीन राखीव ठेवल्या जाणार आहेत. ही प्रक्रिया 15नोव्हेबर पर्यत चालणार आहे. बुधवारी  सकाळी व्हीव्हीपीटी वोटींग मशीन मध्ये नावे चिन्हे भरुन मतदान बरोबर उमेदवारास जाते का याची तपासणी केली.

बुधवारी  360 वोटिंग मशीन सिलबंद करुन श्रीतुळजाभवानी अभियांञीकी महाविद्यालयातील स्पोर्ट हाँल मधील स्ट्राँग रूममध्ये कडक पोलीस बंदोबस्तात

ठेवल्या आहेत. तर मतदानादिवशी आयत्यावेळी मतदान प्रक्रिया थांबू नये म्हणून 80 वोटिंग मशीन राखीव ठेवल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार अरविंद बोळंगे यांनी दिली आहे. तुळजापूर विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या अनुषंगाने तुळजापूर निवडणूक कार्यालयाकडून मतदानाची आवश्यक ती तयारी पूर्ण केली जात आहे.

 
Top