धाराशिव (प्रतिनिधी)- गोरखपूर उत्तर प्रदेश येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय 70 वे अधिवेशन दि.22 ते 24 नोव्हेंबर पर्यंत संपन्न होणाऱ्या अधिवेशास देवगिरी प्रांतातील 30 अभावि पदाधिकारी सदस्य रवाना झाले. त्यामध्ये देवगिरी प्रांत संघटनमंत्री सिध्देश्वर लटपटे, विभाग संघटनमंत्री अजित केंद्रे, प्रांत मंत्री कु.वैभवी ढेवरे आदि अभावि सदस्यगण धाराशिव जिल्हा तून धाराशिव कार्यालय प्रमुख  सार्थकी वाघ हिची उपस्थिती असणार आहे. या राष्ट्रीय 70 व्या अधिवेशास संपूर्ण देशातून हाजारोच्या संख्येने युवा शक्तीचे एकत्रीकरण होणार आहे.


 
Top