तुळजापूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पुनित झालेल्या तुळजापूर विधानसभेची निवडणुक यंदा पक्ष व उमेदवार यांचे अस्तित्व ठरवणारी असल्याने या निकालाची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. ही उत्सुकता शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. 241 तुळजापुर विधानसभा मतदार संघात एकुण 383077 मतदार असुन यापैकी 256571 म्हणजे (66.98) टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

यात एकुण पुरुषांचे 201025 मतदान झाले. या पैकी पुरुषांचे मतदान  135991 झाले. तर महिला मतदार 182045  असुन त्यापैकी  1,20,578 मतदान झाले आहे. इतर इतर 7 मतदार असुन त्या पैकी 2 मतदान झाले आहे. तुळजापूर विधानसभा मतदार संघात सर्वाधीक मतदान  केंद्र क्रमांक 78 जि प प्राथमिक शाळा खुटेवाडी येथे  80.78, तर सर्वात कमी मतदान सलगरा मड्डी जि. प. प्राथमिक शाळा  मतदान क्रमांक 405 येथे 48.88 टक्के झाले. राजुरी मुळेवाडी येथे 75 टक्केच्या पुढे मतदान झाले. तुळजापूर शहराचे एकुण मतदान 29151असुन त्यापैकी 20390 मतदान झाले आहे. यंदा महिला वर्गाचे लक्षणीय मतदान झाल्याने विजयात महिलांची भूमिका महत्त्वाची ठरणार. तिन्ही उमेदवार समर्थक विजयाचे कुंकु आम्हीच उधळणार सांगत आहेत. या निकालाने तालुक्याच्या राजकाय दिशा स्पष्ट होणार आहे.

यंदाही निवडणुकीत  महायुतीत भाजप कडुन विधमान आ. राणाजगजितसिंह पाटील व महाविकास आघाडीकडुन काँग्रेसचे धिरज पाटील व समाजवादी पार्टीचे देवानंद रोचकरी अशी तिरंगी लढत होत असली तर अखेरच्या क्षणी मतदान दिनी प्रामुख्याने ग्रामीण भागात मराठा योध्दा मनोज जरांगे बोलबोला दिसुन आल्याने दोन पाटलांचे विजयाचे गणित तिसऱ्या पाटलांवर अवलंबून राहणार असल्याची चर्चा राजकिय वतुर्ळात चर्चाली जात आहे. शहरी भागात माञ 

विशेष म्हणजे धाराशिव जिल्हयात तुळजापूर विधानसभा एकमेव्य जागा आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी चा लोकसभेला  पराभव झाल्याने ही निवडणुक भाजप व पाटील परिवाराची अस्तित्व लढाई असणार आहे . विशेष म्हणजे आ पाटील निवडुन आले व सत्ता आली तर मंञीपद मिळण्याची शक्यता आहे. तशीच परिस्थिती काँग्रेस ची आहे तुळजापूर विधानसभा मतदार संघ तसा काँग्रेसचा बालेकिल्ला असुन  काँग्रेस जिल्हाध्यक्ष धिरज पाटील प्रथमच ही निवडणुक लढवित असल्याने काँग्रेस पक्षव उमेदवार धिरज पाटील यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. एकदंरीत या निवडणुकीत एक पक्ष व उमेदवार यांचे अस्तित्व संपणार यात वाद नाही.

या जागेवर महाविकासआघाडी तील शिवसेनाउबाटा व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांचा  डोळा आहे. या लढतीकडे संपूर्ण जिल्हयाचे  लक्ष लागले आहे. येथीलसामना अटीतटीचा होणार आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी  विकास लाडकी बहीण हिदुत्व या प्रमुख विषयावर निवडणुक लढवली तर काँग्रेस ने महागाई शेतमाल दर मराठा  आरक्षण याला केंद्र बिंदू समोर ठेवुन लढवली.   समाजवादी पार्टीचे तिसारे  उमेदवार माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांची राजकिय  ताकद  दुर्लणुन  चालणार नाही त्यांनी या निवडणुकीत प्रचंड ताकदीने उतरले व मतदारांन पर्यत पोहचले हीअल्पसंख्याक समाज त्यांच्या पाठीशी आला तर माञ वेगळाच निकाल लागण्याची  शक्यता आहे. लढत ही केवळ दोन नेत्यांची नाही तर दोन राजकीय विचारसरणींची ठरणारी आहे. कोणाच्या मुद्द्यांना मतदार मान्यता देतील, हे निकालावरूनच स्पष्ट होईल.

 
Top