तुळजापूर (प्रतिनिधी)- 241 तुळजापुर विधानसभा मतदार संघासाठी दि. 20 नोव्हेंबर रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यत 2,38,499 म्हणजे 62.26% मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत निर्विघ्नपणे पार पडली. आता 23 मतदारांचे भवितव्य मतपेटीत बंदिस्त झाले असुन मतमोजणी शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी श्रीतुळजाभवानी अभियांत्रिकी महाविधालय स्पोर्ट हाँल नळदुर्ग रोड तुळजापूर येथे होणार आहे. तुळजापूर विधानसभा मतदार संघात एकुण 23 उमेदवार रिंगणात असुन प्रामुख्याने भाजप काँग्रेस समाजवादी पार्टी अशी तिरंगी लढत दिसुन आली.
एकुण 3,80,808पैकी 2,38,499 एवढे मतदान झाले. तुळजापूर विधानसभेचे भाजपचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तेर येथे तर काँग्रेसचे अँड धिरज पाटील व समाजवादी पार्टीचे देवानंद रोचकरी यांनी तुळजापूर व अपक्ष उमेदवार अमीरशेख यांनी आपसिंगा येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. 241 तुळजापूर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी 7 ते 9 या दोन तासात अवघे 5.73 टक्के मतदान झाले. नंतर 9 ते 11 या कालावधीत मतदार येवु लागल्यामुळे 18.13टक्के मतदान झाले. 11 ते 1 या कालावधीत 33.90 टक्के. 1 ते 3 या कालावधीत 47.69 टक्के. 3 ते 5 या कालावधीत 62.26 टक्के मतदान झाले. मतदान केंद्रावर उमेदवार समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. मतदान प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार डव्हळे व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार अरविंद बोळंगे यांच्या मार्गदर्शन खाली संपन्न झाली.