तुळजापूर (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुक कालावधीत श्रीतुळजाभवानी देविचे पुजेचे दर निश्चित करण्या बाबतीत आयोजित बैठकी बाबतीत निवडणुक विभागाने तहसिलदार तथा व्यवस्थापक प्रशासन श्रीतुळजाभवानी मंदीर यांना चोवीस तास आत खुलासा सादर करण्या बाबतीत नोटीस बजावली आहे.

महाविकास आघाडीचे  शाम अंबादास पवार तुळजापूर यांनी तुळजाभवानी देवीचे पूजेचे दर निश्चित करणेबाबत बोलविण्यात आलेले बैठकीबाबत या कार्यालयाकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. सदर अर्जामध्ये अर्जदार यांनी सदरील बैठक निवडणूकीच्या आचारसंहिता चालू असल्याने मंदिर संस्थांनचे तहसीलदार तसेच विश्वस्त यांच्यात संगणमत करुन राजकीय उमेदवारास मदत होण्याकरिता या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. आचारसंहितेचा कालावधी चालू असताना तुळजापूरातील व्यापारी व पुजा-यांना दबाव आणण्यासाठी किंवा प्रभावित करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे दिसून येते. सदरील बैठकीमुळे तुळजापूर शहरातील पुजारी व व्यापारी हे भयभित झाल्याचे दिसून येत आहे असे नमुद केले आहे.

सदर तक्रारी अर्जाची प्रत या सोबत जोडून देण्यात येत असून सदर तक्रारीच्या अनुषंगाने आपल्या कार्यालयाचा खुलासा सदर नोटिस प्राप्त झाल्या पासून 24 तासाच्या आत या कार्यालयाकडे सादर करावे. अन्यथा आपल्या विरुध्द उचित कार्यवाही अनुसरण्यात येईल याची नोंद घ्यावी. अशी नोटीस (निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मान्यतेने) सहायक निवडणूक निर्णय अधिकारी 241 -तुळजापूर विधानसभा मतदारसंघ यांनी बजावली आहे. या बाबतीत काय खुलासा येतो. याकडे सर्वांचा नजरा लागल्या आहेत.

 
Top