धाराशिव (प्रतिनिधी)-  लोकसभा निवडणुकीच्या वेळेस दणका बसल्यामुळे लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. लाडक्या बहिणींला 1 हजार 500 रूपये तर दाजींच्या सोयाबीनचा भाव मात्र 10 हजारावरून 3 हजार 200 रूपये. त्यामुळे हे सरकार शेतकरी विरोधी धोरण राबविणारे सरकार आहे. अशी टिका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे कळंब-धाराशिव मतदारसंघाचे उमेदवार आमदार कैलास पाटील यांच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात केली. 

कळंब तालुक्यातील श्रीक्षेत्र खंडोबा मंदिर देवधानोरा येथे प्रचार शुभारंभ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी आमदार कैलास पाटील यांनी शिवसेना फुटल्यानंतर 50 खोक्यावर लाथ मारून उध्दव ठाकरे यांना साथ दिली. कैलास पाटील यांची राजकीय कारर्किद ग्रामपंचायत सदस्य, संरपच, जिल्हा परिषद सदस्य अशा विविध पदावर काम करत पाटील यांनी समाजसेवेचा वारसा जपला आहे. स्व. विलासराव देशमुख यांच्या विचाराची आणि कार्यशैलीची झलक कैलास पाटील यांच्यात दिसते. जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणण्यास पाटील यांचे मोठे योगदान आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी पीकविम्याच्या मुद्दावर ऐन दिवाळीत त्यांनी आमरण उपोषण केले. त्यामुळे पाच वर्षे या मतदारसंघासाठी ते झटले आहेत. आता आपण सर्वांनी त्यांना निवडून द्यावे असे आवाहन खा. ओम राजेनिंबाळकर यांनी केले. 

यावेळी माजी आमदार दयानंद गायकवाड यांचेही भाषण झाले. पांडुरंग कुंभार, श्रीमती सपाटे ताई, महेबुब पटेल, संजय देशमुख, राजाभाऊ शेरखाने, बालाजी जाधवर, विश्वजीत जाधव, बाळासाहेब काकडे, प्रविण कोकाटे, मुजीब काझी, रूकसाना, संग्राम देशमुख आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top