भूम (प्रतिनिधी)- परांडा विधानसभा मतदार संघात 21 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सोमवार दि 4 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. परांडा विधानसभा मतदार संघात एकूण 42 उमेदवारांचे उमेवारी अर्ज आले होते. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी 21 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे आता 21 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. परांडा विधानसभा मतदार संघाचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. परांडा विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत पाहावयास मिळणार आहे. या मतदार संघात प्रा डॉ तानाजी सावंत (शिवसेना शिंदे गट),महादेव लोखंडे(बसपा),राजेंद्र भराटे(बसपा),राहुल मोटे(राष्ट्रवादी),प्रवीण रणबागुल(वंचित बहुजन आघाडी), ॲड. रेवण भोसले (समाजवादी पार्टी),आर्यनराजे शिंदे,राहुल घुले (रासप),शाहनहान शेख,अरुण जाधवर,दिनेश मांगले,नूरजहाँ शेख,बंडू पौळ,विनयराज देशमुख,असिफ जमादार,लक्ष्मीकांत आटूळे,गुरुदास कांबळे,सोमनाथ कदम,जमिलखा पठाण,राहुल रामहरी मोटे,संभाजी शिंदे हे उमेदवार रिंगणात उतरले आहेत.