तुळजापूर (प्रतिनिधी)- 241 तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी स्पोर्ट्स हॉल, श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
मतमोजणी वेळी मशीनसाठी एकूण 14 टेबल, पोस्टल मतपत्रिकेसाठी एकूण आठ टेबल व ईटीपीबीएस मतमोजणीसाठी एकूण दोन टेबल असे एकूण 24 टेबल निश्चित करण्यात आलेले आहेत. मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होणार असून, सुरुवातीला पोस्टल मतमोजणीने मतमोजणीस सुरुवात होणार आहे. त्यानंतर ईव्हीएम मशीनची मतमोजणी करण्यात येईल. ईव्हीएम मशीन मतमोजणीच्या टेबलवर एक पर्यवेक्षक एक सहाय्यक व एक सूक्ष्म निरीक्षक असणार आहेत. पोस्टल मतमोजणीसाठी एक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व दोन कर्मचारी यांची एका टेबलला नियुक्ती असणार आहे. ईव्हीएम मशीन मतमोजणीसाठी एकूण 30 फेरी होतील. 241 तुळजापूर विधानसभा मतदार संघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून रामप्रसाद चव्हाण यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.