तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत तसेच दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत एकूण 65 लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
तेर येथे संत कबीर नगर मातंगवस्ती येथे भुयारी गटार व रस्ता बांधकाम, मातंग स्मशानभूमी येथे शेड व रस्ता बांधकाम, लहुजी नगर येथे सभागृह बांधकाम, भीमनगर येथील संविधान चौक सुशोभीकरण, निळा झेंडा चौक येथील सभागृह दुरुस्ती आणि इंदिरानगर येथे बंदिस्त गटार बांधकाम अशी महत्त्वाची कामे सुरू होत आहेत.
महायुती सरकारने तेर व परिसरातील विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून, त्यामुळे तेरमध्ये सातत्याने विकासकामे सुरू आहेत. पुढील काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही तेरच्या विकासासाठी अधिक निधी आणण्याचा प्रयत्न राहणार आहे. यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वांनी खंबीर साथ द्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी केले.यावेळी भास्कर माळी, नवनाथ नाईकवाडी, प्रविण साळुंके, राहुल गायकवाड,सुनिल गायकवाड,बिभीषण लोमटे,प्रजोत रसाळ, अजीत कदम, गणेश फंड,सोमनाथ माळी, केशव वाघमारे, अमोल सावंत, दत्ता कांबळे यांच्यासह या भागातील नागरिक उपस्थित होते.
