धाराशिव (प्रतिनिधी)- शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे उपाध्यक्ष तथा बालेकिल्ला प्रतिष्ठानचे अध्यक्ष आकाश मिलिंदराव कोकाटे यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला. धाराशिव येथे झालेल्या जाहीर सभेत हा प्रवेश सोहळा पार पडला. कोकाटे यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेचे धाराशिव शहरातील संघटन अधिक मजबूत होईल असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी व्यक्त केला.
धाराशिव येथे महायुती उमेदवाराच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा घेण्यात आली. या वेळी धाराशिव येथील कट्टर युवा शिवसैनिक आकाश मिलिंदराव कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला. मुख्यमंत्री महोदयांनी आकाश कोकाटे यांच्यासह प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी तुळजापूर-धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, ज्येष्ठ नेते ॲड.खंडेराव चौरे, सुधीर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, तालुकाप्रमुख अजित लाकाळ, रिपाइं जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओहाळ यांच्यासह महायुती घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.