धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  मेकॅनिकल विभागाच्या चार विद्यार्थ्यांची लातूर येथील अशोक लेलँड चे प्रसिद्ध डीलर सागर मोटर्स यांच्या विविध विभागासाठी निवड झाली आहे.कंपनीची प्रतिनिधी श्री . रवी जोशी यांनी मुलाखती घेतल्या . सागर मोटर्स चे मराठवाड्यामध्ये लातूर , धाराशिव , बीड या जिल्ह्यामध्ये कामकाज असून विद्यार्थ्यांना सागर मोटर्स च्या कामकाजाचा चांगला अनुभव मिळणार आहे. या प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले कि “आम्ही मुलांना त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपनी मध्ये काम करण्याची संधी देत असून विद्यार्थी त्यांच्या कलागुणानुसार येणाऱ्या कंपनीमध्ये आपल्या स्वतःच्या निवडीस प्राधान्य देत आहेत. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपल्याच भागामध्ये नोकरी करावयाची आहे अशा विद्यार्थ्यांना आपल्याच भागामध्ये ही संधी उपलब्ध करून दिली आहे.

येणार काळ हा मेकॅनिकल, सिव्हिल ,कम्युनिकशन या कोर सेक्टर मधील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगला असून  विद्यार्थी त्या दृष्टीने कॅम्पस प्लेसमेंट ची तयारी  आम्ही  करत आहेत. विभागाचे नरेंद्र साप्ते , महेश सावंत, प्रतीक साखरे ,ज्ञानेश्वर शेरकर या विदयार्थ्यांची निवड झाली आहे. या ड्राईव्ह चे आयोजन प्रा. अशोक जगताप,प्रा. रणजित दंडनाईक,प्रा .अनिरुद्ध देशपांडे, रामेश्वर मुंढे  यांनी केले होतें. तेरणा ट्रस्टचे अध्यक्ष  डॉ. पदमसिंह पाटील, संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह  पाटील,  मल्हार पाटील, मेघ पाटील आणि व्यवस्थापकीय समन्वयक प्रा.गणेश भातलवंडे, व सर्व विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांनी यांनी निवड झालेल्या विद्यार्थींचे  अभिनंदन केले आहे.


 
Top