तुळजापूर (प्रतिनिधी)-  शहरासह परिसरात गुरु पोर्णिमा उत्सव पारंपरिक पध्दतीने गुरुंचे आशिर्वाद घेऊन गुरुपोर्णिमा उत्सव साजरा केला गेला. गुरुपोर्णिमा निमित्ताने  श्रीतुळजाभवानी चांदी सिंहासनावर आकर्षक  फुलांची सजावट केली होती.      

तिर्थक्षेञ तुळजापूर  महंताची नगरी आहे. येथील महंत तुकोजीबुवा महंत वाकोजी बुवा, महंत चिलोजीबुवा, महंत इछागिरी, सोमवार गिरी महंत, दत्तअरण्य या महंत गुरुचा दर्शनार्थ आशिर्वाद घेण्यासाठी भक्तीनी मठांमध्ये गर्दी केली होती. आज दिवसभर मंदीरातील  विविध रांगा भाविकांनी भरभरुन गेल्या होत्या. राञी मंदीर प्रांगणात छबिना काढण्यात आल्यानंतर  प्रक्षाळ पुजेनंतर  महंत वाकोजीबुवा यांनी उपरण्यात जोगवा मागितल्यानंतर  गुरुपोर्णिमा दिनाचा धार्मिक विधीचा सांगता झाला.


गुरुपोर्णिमे निमीत्ताने महंताचा सन्मान

गुरू पौर्णिमेच्या निमित्त  श्रीतुळजाभवानी  यां  मंदिर संस्थान तर्फे महंत वाकोजीबुवा, महंत हमरोजी बुवा यांना भरपेहराव आहेर देवुन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले, कराळे, रविचंद्र गायकवाड उपस्थितीत होते.

 
Top