परंडा (प्रतिनिधी)- मराठवाड्यात अनेक तालीम संघ आहेत परंतु सोनारी येथील जि.प.धाराशिवचे माजी सभापती भैरवनाथ तालीम संघ व पै.नवनाथ आप्पा जगताप स्पोर्टस्‌‍ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पै. नवनाथ जगताप यांनी राजश्री छत्रपती शाहूराजे यांचा वारसा सांभाळत तालीम संघाची स्थापना करून महाराष्ट्राभर गाजत असलेले मल्ल तयार करण्याचे काम अनेक वर्षापासून करत आले आहेत. आधूनिक काळात मॅटवरील कुस्तीचे आखाडे भरतात. भारत देश आणि जगभरात मातीवरील कुस्ती बरोबरच मॅटवरील कुस्तीचे वाढत चालले. महत्व आणि आकर्षण पाहून पै.मातीवरील कुस्ती बरोबरच मॅटवरील कुस्तीचे प्रशिक्षण केंद्र परंडा येथे उभा केल्याने कुस्ती क्षेत्रातील तमाम कुस्तीगिरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 गुरुवार दि.10 रोजी मॅट हॉलची पाहणी करून सर्व कुस्तीप्रेमी यांनी आदरभावनेने पै.नवनाथ जगताप यांचे फेटा, शाल, गुलाब हार घालून गुरुपोर्णिमेचे औचित्य साधून कुस्तीगिरांचे गुरु यांचा आदरपूर्वक सन्मान केला. यावेळी जुन्या काळातील पैलवान तुकाराम गंगावणे, छत्रपती शासन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्राणजित गवंडी, रमेश जगताप, विजय चव्हाण, सुप्रसिद्ध पैहलवान सतिष मिस्किन, रामा गोडगे, हरि घोगरे, प्रशांत शिंदे, कैलास झिरपे, विठ्ठल ढगे,समिर पठाण, शंकर खैरे , प्रदीप ढगे, बिरुदेव राऊत, मनोज बकाल व प्रशिक्षणार्थी कुस्तीपट्टू यांनाही हजर राहून अभिष्टचिंतन केले.भव्य दिव्य हॉल निर्माण करून नवनाथ आप्पा आणि धाराशिव तसेच महाराष्ट्रातील कुस्तीगीरांची उत्कृष्ठ सोय केल्याने या पंचक्रोशीत त्यांचे कौतुक होत आहे.    


 
Top