धाराशिव (प्रतिनिधी)- आपले विविध मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेने 5 ऑक्टोबर 2024 पासून मुंबई येथील आझाद मैदान येथे उपोषण सुरू केले आहे. त्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील  सर्व शिक्षण विस्तार अधिकारी यांनी सामूहिक रजा टाकून आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.

शिक्षण विस्तार अधिकारी यांना दरमहा कायम प्रवास भत्ता मिळावा. शिक्षण विस्तार अधिकारी यांच्यामधून उपशिक्षणाधिकारी पदावर पदोन्नतीचा कोटा 80 टक्के एवढा करण्यात यावा. महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब (उपशिक्षणाधिकारी प्रशासन शाखा) या पदावर पदोन्नतीची प्रक्रिया तात्काळ पार पा. त्यासाठी अंतिम सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करावी. शिक्षण विस्तार अधिकारी हे पद ग्रामविकास विभागाकडून शालेय शिक्षण विभाग कडे वर्ग करून त्या पदाला  वर्ग दोन चा दर्जा देण्यात यावा. आदी मागण्यासाठी हे आंदोलन चालू आहे. 

आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी यांनी दिनांक 9 ऑक्टोबर पर्यंतच्या सामूहिक रजा घेऊन आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी मल्हारी माने, सुशील फुलारी, दत्तप्रसाद जंगम यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सुमारे 22 शिक्षण विस्तर आधिकाऱ्यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. 

 
Top