धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन , संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या अखत्यारीत असलेल्या सर्व वैद्यकीय महाविदयालये यांच्या तर्फे सर्वांसाठी मुख अभियान महाराष्ट्रभर राबविण्यात आले. या अभियानाअंतर्गत शालेय विद्यार्थी व वृद्ध व्यक्तीचे दंत आरोग्य याबाबत जनजागृतीसाठी शालेय स्तरावर जिल्हास्तरीय निबंध, रांगोळी, झिंगल व चित्र रंगभरण, घोषवाक्ये या स्पर्धेचे आयोजन जिल्हाभर करण्यात आले होते.

या जिल्हयास्तरीय विविध स्पर्धेत श्रीपतराव भोसले हायस्कूलने घवघवीत यश संपादन केले. या झालेल्या स्पर्धेत निबंधामध्ये रागिनी घुटे, झिंगलमध्ये वृंदा लंगडे, घोषवाक्येमध्ये अर्जुन वाणी, चित्रकलेमध्ये आदया रवी वाघे तर रांगोळीमध्ये प्राची जगताप यांना शासकीय वैदयकीय महाविद्यालयाच्या क्ष किरण अधिष्ठाता डॉ. शिल्पा दोमकुंडवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

या स्पर्धकांना अभिजीत पाटील, शिवाजी भोसले, एम. एस.पवार, व्ही.एन तुळजापुरे यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी श्रीपतराव भोसले हायस्कूलचे पर्यवेक्षक सुनील कोरडे, डॉ. नागेश वाघमारे, डॉ. क्षितिजा बनसोडेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 
Top