धाराशिव (प्रतिनिधी)- समर्थ नगर येथे राम मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देवीची स्थापना करण्यात आली. यावर्षी देवी स्थापनेचे हे 24 वे वर्ष आहे. यावर्षीची थीम देवी अहिल्या आणि संत मीरा अशी आहे. रोज स्तोत्र पठण, आरती यासह लोकमाता अहिल्यादेवी आणि संत मीरा यांच्या जीवनावर आधारित प्रसंगांचे नृत्य सादरीकरण केले जाते. यासाठी कॉलनीमध्ये आठ गट तयार करण्यात आले असून रोज एका गटाचे सादरीकरण होते.

या डेकोरेशन रांगोळी हे सुद्धा देवी अहिल्या आणि संत मीरा यांच्यावर आधारित काढली जाते. काही गटांनी महिलांसाठी काही खेळांचे ही आयोजन केले होते. या खेळामध्ये कॉलनीतील महिला उत्साहाने सहभागी होतात. या कार्यक्रमासाठी मंडळातील सर्व सदस्यांचा सहभाग असतो.

 
Top