धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील ठाकरेनगर नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने गुरुवारी (दि.3) आदिशक्ती तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र येरमाळा येथील श्री येडेश्वरी मंदिरातून भवानी ज्योत आणून भव्य मिरवणुकीने देवी मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंडळाच्या वतीने गेल्या 23 वर्षापासून नवरात्र महोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा सुरु करण्यात आली असून ती आजही कायम आहे. आज गुरुवारी नायब तहसिलदार घृष्णेश्वर स्वामी यांच्या देवीमूर्तीचे विधीवत पूजन करुन प्रतिष्ठापना व त्यानंतर घटस्थापनेने नवरात्र महोत्सवास प्रारंभ करण्यात आला.
ठाकरेनगर नवरात्र महोत्सव मंडळाचे संस्थापक तथा मार्गदर्शक प्रशांत साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी विविध समाजोपयोगी कार्यक्रमाने नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील महोत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. गेल्या काही वर्षापासून नवरात्र महोत्सव काळातील सर्व कार्यक्रमाचे नियोजन नारीशक्तीच्या हाती सोपविण्यात आले असून यावर्षीदेखील प्रतिष्ठापनेपासून नवरात्र महोत्सव कालावधीत होणाऱ्या कार्यक्रमांची जबाबदारी महिलांवर सोपविण्यात आली आहे.
गुरुवारी सकाळी श्रीक्षेत्र येरमाळा येथील येडेश्वरील मंदिरातून प्रज्वलित करुन आणलेल्या भवानी ज्योतचे धाराशिव शहरात आगमन झाल्यानंतर विविध मंडळांच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर मंडळाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी भवानी ज्योतचे पूजन केले. यंदाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेले नायब तहसिलदार घृष्णेश्वर स्वामी यांच्या हस्ते देवीमूर्तीचे पूजन आणि घटस्थापना करण्यात आली. नवरात्र महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मंडळाचे संस्थापक प्रशांत साळुंके, नवरात्र महोत्सवाच्या आधारस्तंभ शामल साळुंके, अध्यक्षा सुरेखाताई खांडेकर, उपाध्यक्षा सत्यशीला गायकवाड, सचिव प्रतिभा गाडे, लता इंगळे, श्रद्धा उगलमोगले, तसेच शिवानी कोळी, योगिता निलंगे, कोमल कदम, वर्षा डोके, मीनाक्षी महामुनी, मंगल सलगर, निकिता सिरसट, दीपाली चौधरी, रेखा शिंदे, दीपाली गायकवाड, रुक्मिणी सुर्यवंशी, सुरेखा पवार, अनारकली शिंदे, सत्यभामा खोत, शितल कसपटे, इंदू जगताप, लता राठोड, शुभांगी काळे, राणीताई काळे, अनिताताई शेंडगे, विमल साठे, योजनाबाई सलगर, अर्चना सोनटक्के, पूजा वाघमारे यांच्यासह मंडळाच्या सर्व महिला पदाधिकारी, भाविक व आराधी मंडळाच्या सदस्य उपस्थित होत्या. मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर बोलताना मंडळाचे संस्थापक तथा मार्गदर्शक प्रशांत (बापू) साळुंके यांनी नवरात्र महोत्सव काळातील सर्व धार्मिक व सांस्कृति कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.