नळदुर्ग (प्रतिनिधी)- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे धाराशिव जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांचा आढावा घेतला होता. त्यावेळी प्रमुख पदाधिका-यांना पक्ष बांधणी संदर्भात गटाध्यक्षाची नेमणूक करा असा आदेश दिला होता. त्यानुसार पक्ष निरीक्षक नयन कदम यांच्या सूचनेनुसार मनसे जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव यांनी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर तुळजापूर,नळदुर्ग,जळकोट,अणदूर,इटकळसह 40 गावातील गटाध्यक्षाची नियुक्ती केली आहे.उर्वरित गावातील गटाध्यक्षाची नियुक्ती लवकरच होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

आगामी विधानसभा,जि.प.,पंचायत समिती,नगर पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेचे पदाधिकारी पक्ष बांधणीवर जोर देत आहेत. या निवडीचे स्वागत जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,तुळजापूर तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार,तालुका सरचिटणीस गणेश पाटील,नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,मनविसे तालुकाध्यक्ष सूरज चव्हाण,तुळजापूर माजी शहराध्यक्ष धर्मराज सावंत,उपाध्यक्ष अविनाश पवार,विशाल माने,रवि राठोड,ग्रामीण विभाग अध्यक्ष गणेश बिराजदार,मनविसे नळदुर्ग शहराध्यक्ष निखिल येडगे,अणदूर शहराध्यक्ष सोमेश्वर आलूरे,जळकोट शहराध्यक्ष आकाश पटणे,रामाणंद रिंगणे,अमित जगताप आदींनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत.

 
Top