धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी शुभम दत्तात्रय गटकळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधून कृषी अधिकारी व विशाल महेंद्र कदम हे ग्रामसेवक पदी नियुक्ती बद्दल आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने संस्था सरचिटणीस प्रेमाताई पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी या दोघांनीही आपण इयत्ता पाचवीपासून या प्रशालेत शिक्षण घेऊन यश मिळवले. यामध्ये शिक्षकांचा व संस्थेचा अर्थात प्रशालेचा मोठा हातभार असल्याचे या प्रसंगी त्यांनी मनोगत विशद केले.
तसेच संस्था सरचिटणीस प्रेमाताई पाटील यांच्या हस्ते प्रशालेतील गरजू व गरीब होतकरू 71 विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. एस.ए. देशमाने यांच्या पुढाकाराने समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून या गणवेशासाठी निधी संकलन करण्यात आले. याच कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरूपात काही दानशूर व्यक्तींचा सत्कार संस्थेकडून करण्यात आला.
या प्रसंगी माजी प्राचार्य तथा संस्था संचालक यु .व्ही. राजे , प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, विनोद आंबेवाडीकर, पर्यवेक्षक सुनील कोरडे, श्रीमती बी. बी. गुंड तसेच सेवानिवृत्त शिक्षक एन.एल. गोरसे,आर.टी. आदटराव,ए. ए. देशमुख, श्रीमती एस. ए.देशमाने, व्ही.एन. तुळजापुरे, एस.एम.देशमुख इतर मान्यवर व अध्यापक उपस्थित होते.