धाराशिव (प्रतिनिधी) - आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डी फार्मसी इन्स्टिट्यूट केशवनगर उमरे कोठा धाराशिव हे महाराष्ट्र शासन अनुदान प्राप्त तत्त्वावर सन 1982 - 1983 पासून डी. फार्मसी अभ्यासक्रमाचे शिक्षण गेली 42 वर्षे धाराशिव सारख्या मागास जिल्ह्यात देत आहेत. याच कार्यरत संस्थेत फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया,नवी दिल्लीच्या नियमानुसार नवीन बी. फार्मसी पदवी अभ्यासक्रम प्रवेश क्षमता-60 विनाअनुदानित तत्त्वावर चालू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होत. त्याप्रमाणे फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेर, रायगड यांची मान्यता मिळालेली आहे. बी फार्मसी प्रवेश प्रक्रियेचे दुसऱ्या फेरीमध्ये चॉईस कोड -202782370 या क्रमांकाचे ऑप्शन उपलब्ध होणार आहे. नवीन बी. फार्मसी अभ्यासक्रम चालू केल्याबद्दल आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, सचिव सौ प्रेमाताई पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील यांच्या अभिनंदन गोरख देशमाने प्राचार्य यांनी केले आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कॉलेजला पसंती क्रम द्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.