तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवात याञा अनुदान मधुन भाविकांची वर्दळ आहे अशा ठिकाणी वीजदिवे लावुन सदरी भाग याञा काळात प्रकाशमान करण्याचे नियोजन असते.  नियोजनातील अनेक कमी वर्दळीचा जागा निश्चीत करुन अनेक जागेवर विद्युत दिवे न लावता सदरील भाग प्रकाशमान ठेवल्याचे दाखवुन याञा अनुदान लाटण्याची शक्यता असल्याने प्रकाशमान केलेल्या भागाचे व्हीडीओ पाहुन त्याचेच बिल याञा अनुदानामधुन अदा करण्याची मागणी होत आहे.

घाटशिळ मध्ये नवराञोत्सवात पहिल्या माळेच्या आदल्या दिवसापासून भाविक चालत येतात. येथे माञ अश्विनी पोर्णिमा पुर्वसंध्येला घाटशिळ रस्त्यावर दिवे लावुन हा भाग प्रकाशमान केल्याचा देखावा केल्याचा आरोप भाविकांमधुन केला जात आहे. तिर्थक्षेञ तुळजापूरात यंदा नवराञोत्सव अश्विनी पोर्णिमा उत्सवात अपेक्षित सोयी सुविधा  भाविकांना न पुरवता पुरवल्याचा देखावा करुन याञा अनुदान वर डल्ला मारण्याचा प्रयत्न होत आहे. भाविकांच्या सेवेसाठी शाषणाने दिलेल्या याञा अनुदान वर कुणी डल्ला मारु नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रकाशमान केलेल्या भागाचे व्हिडीओ शुटींग पुरावा घेवुनच त्याचे बिल अदा करावे अशी मागणी शहरवासियांमधुन केली जात आहे.

श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञोत्सवातील अंतिम पर्व अश्विनी पोर्णिमा या कालावधीत राञअपराञी लाखोनी भाविक येतात. यांना अंधाराच्या साम्राज्यास सामोरे जावु लागु नये म्हणून शाषणाचा याञा अनुदान मधुन शहरात व बाह्य भागात विद्युत दिवे लावले जावुन भाग प्रकाशमान केला जातो. व नंतर त्याचे बिल अदा केले जाते. यंदा  अश्विनी पोर्णिमा दिनी भाविकांची वावर होणाऱ्या  ठिकाणी अंधारच साम्राज्य  दिसुन आले. धाराशिव, लातुर नळदुर्ग महामार्ग रस्त्यावर चक्क  मोठ्या संख्येने  नगरपरीषद पथदिवे बंद असल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी अपुरे प्रकाश देणारे बल्ब लावले याच पोलवर याञा अनुदान मधुन विद्युत  बल्ब लावावे लागले म्हणजे हा उधोग याञा अनुदान मधुन विद्युत ठेकेदारास जादा रक्कम मिळावे यासाठी तर नव्हता ना असा सवाल विचारला जात आहे तुळजापूर खुर्द भागातील बायपास पुलाखाली चार पाच लाईट लावल्या तुळजापूर खुर्द ते तडवळा बायपास रस्तावर लाईट न लावल्याने हा रस्ता  पुर्णताअंधारात होता. या रस्त्यावरून जवळपास नवराञोत्सवात पन्नास ते साठ हजार भाविक येतात लातुर रोडवरील बसस्थानक कडे जाणाऱ्या रस्त्यावर असणारे पथदिवे बंद होते. येथुन भाविकांना अंधारात बसस्थानकात जावे लागले.  मोतीझरा भागात तर लाईट सोडा लाईट लावण्यासाठी बांबु ही उभे केले नव्हते. अनेक  वाहनतळात कमी बल्ब लावले होते. त्यामुळे भाविकांना कमी उजेडातच वाहने लावावी लागले. एकुणच कमी भाग प्रकाशमान करुन जादा भाग प्रकाशमान केल्याचे बिल सादर करुन ठेकेदार याञा अनुदान लाटण्याची शक्यता असुन या बाबतीत सदरील भागाचे व्हीडीओ पुरावे सादर करुन घेवुनच बिल अदा करावे म्हणजे शाषण पैशाची अफरातफर होणार नाही.

 
Top