धाराशिव (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय येथे 'इंटरनेट ऑफ थिंग्ज' या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागातर्फे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

आजच्या आधुनिक युगात आर्टिफिशिअल इंटिलीजन्स,मशीन लर्निंग,डेटा सायन्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज अश्या प्रगत तंत्रज्ञानावर आधारित विषयांचा समावेश अभियांत्रिकी शिक्षणात करण्यात आलेला आहे.या विषयांवर आधारित अनेक उपकरणे,साहित्य आज लोकप्रिय होत आहेत.त्यामुळे या विषयांचा अभ्यास अत्यावश्यक बनला आहे.या अनुषंगाने ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी उद्बोधक ठरणार आहे.

ही संकल्पना लक्षात घेऊन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने यांनी सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय मुंबईचे उप प्राचार्य डॉ.वाय.श्रीनिवास राव यांना या कार्यशाळेसाठी आमंत्रित केले. डॉ.राव हे इंटरनेट ऑफ थिंग्ज या विषयातील नामवंत तज्ञ आहेत.त्यांच्या या उत्कृष्ट अनूभवाचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल या दृष्टीने डॉ.माने यांनी डॉ.राव यांना निमंत्रित केले आणि डॉ.राव यांनीही त्यांचा बहुमूल्य वेळ या विद्यार्थ्यांसाठी दिला.

यावेळी प्राचार्य डॉ.माने यांनी पाहुण्यांचे आभार व्यक्त करून इंटरनेट ऑफ थिंग्ज या विषयाची व्याप्ती आणि त्याचे दैनंदिन मानवी जीवनातील उपयोग यावर त्यांचे विचार मांडले. तसेच विभागप्रमुख डॉ.कोल्हे यांनी मार्गदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.विमोक्षवर्धन डावरे यांच्या बरोबर प्रा. वर्षा बोंदर यांनी काम पाहिले. यावेळी प्रा.शिवाजी शिंदे, प्रा. श्रीकांत अघोर, प्रा. वंदना मैन्दर्गी, प्रा. दर्शन ठाकूर, प्रा. ज्ञानेश्वर हराळकर, प्रा. अभिजीत बोरकर, विक्रम पवार आणि शेख हे उपस्थित होते.

 
Top