तेर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील महामंडळाच्या कमिटया व अशासकीय कमिट्या जाहीर करण्याची मागणी भारतीय किसान मोर्चाचे धाराशिव तालुका उपाध्यक्ष हनुमंत कोळपे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील विविध महामंडळाची कार्यकारीणी व विभागीय स्तरावरील महामंडळाची कार्यकारीणी जाहीर करावी तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील अशासकीय कमिट्या त्या त्या पालकमंत्री यांना जाहीर करण्याची आदेश महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता पूर्वी करण्याचे आदेश देण्याची मागणी भारतीय किसान मोर्चाचे धाराशिव तालुका उपाध्यक्ष हनुमंत कोळपे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. निवेदनाच्या प्रति उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पाठविलेल्या आहेत.