तुळजापूर (प्रतिनिधी)-  मी माझा मतदार संघातील 36 हजार महिलांना रोजगार दिला आहे. लाडके मुख्यमंत्री ताईसाठी येवढे करतात आणी तुम्ही उपोषणाला बसलात. तरी तुम्ही माझावर विश्वास ठेवा तुम्हाला मी न्याय मिळवुन देतो असे आश्वासन उपोषण कर्त्या महिला बचत गटांच्या महिलांना पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री डॉ. तानाजी  सावंत यांनी आश्वासन दिल्यानंतर त्यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर मागील दोन दिवसापासुन उपोषणाला बसलेल्या महिलांनी पाणी पिवुन उपोषण सोडले.  यावेळी उपोषणकर्त्यां महिलांनी आमचा मुख्यमंत्री व तुमच्यावर विश्वास असल्यानेच आम्ही  उपोषण मागे घेत असल्याचे यावेळी म्हणाल्या.

पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत जावुन आपली मागणी मुख्यमंत्री यांच्या पर्यंत पोहचून आपल्याला न्याय मिळवुन दिला जाईल असे आश्वासन  दिल्याने महिला बचत गटांचा कार्यकत्यांनी शुक्रवार सांयकाळी उपोषण स्थगित केले. यावेळी जिल्हाअधिकारी डॉ. सचिन ओम्बासे उपस्थित होते.

महिला व बालविकास विभाग अंतर्गत माहिला बचत गटांना पोषण आहार पुरवठ्याचे काम विभागाने मुदत संपल्याचे कारण देत कार्पेरेट क्षेत्रातील बलाढ्य कंपनीच्या घशात घालुन  संपुर्ण महाराष्ट्रातील 45000 महिला बचत गटाचे काम पर्यायी व्यवस्था म्हणून एकाच व्यक्तीला देण्यात आले होते. 

मुख्यमंत्र्यांकडून आपणास न्याय देण्यात येईल. असे आश्वासन दिल्याने महिला बचत गटांनी सुरु केलेले उपोषणकर्त्या कल्पना गायकवाड, माया चव्हाण, किरण निंबाळकर, मिना सोमाजी, नयना महाजन, रुपाली घाडगे, जयश्री महाजन, कोमल महाजन यांनी पाणी घेऊन उपोषण सोडले. उपोषण स्थळी क्राँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष धिरज पाटील, अमोल कुतवळ आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा परिषदेचे सीओ मैनाक घोष, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे उपस्थित होते.

 
Top