धाराशिव (प्रतिनिधी)- राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या कुटुंबाकडे 233 कोटी रूपयांची मालमत्ता आहे. तर उमरगा मतदारसंघाचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याकडे 7 कोटी 41 लाख रूपयांची मालमत्ता आहे. एकदर पालकमंत्री तानाजी सावंत व आमदार चौगुले यांच्या संपत्तीमध्ये गेल्या पाच वर्षात वाढ झाली आहे. मंत्री सावंत यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत गुंतवणुकीवरील परतावा, भाडे, आमदार मानधन, शेती व संचालकपदाचा पगार आहे. आमदार चौगुले यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत शेती व आमदार मानधन असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. 


डॉ. तानाजी सावंत, परंडा यांचे शिक्षण बीई इलेक्ट्रिकल, पीएचडी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड येथे केली आहे. त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत गुंतवणुकीवरील परतावा, भाडे, आमदार मानधन, शेती व संचालक पगार आहे. उत्पन्न 3 कोटी 36 लाख आहे. रोख रक्कम  2 लाख 65 हजार दाखविण्यात आली आहे. वाहने ट्रॅक, बीएमडल्ब्लुसह 6 कार दाखविण्यात आली आहे. तर  सोने 80 तोळे (किंमत 57 लाख) आहे. जंगम मालमत्ता 128 कोटी 66 लाख, पत्नीकडे 1 कोटी 14 लाख दाखविण्यात आली आहे. तर 2019 मध्ये 127 कोटी 15 लाख व पत्नीकडे 31 लाख 73 हजार दाखविण्यात आले होते. स्थावर मालमत्ता 79 कोटी 70 लाख, पत्नीकडे 25 कोटी 70 लाख दाखविण्यात आली आहे.  तर 2019 मध्ये 53 कोटी 56 लाख व पत्नीच्या नावे 5 कोटी 68 लाख, मुलांकडे 11 कोटी दाखविण्यात आले होते. कर्जे 9 कोटी 9 लाख व पत्नीच्या नावे 7 कोटी 95 लाख दाखविण्यात आले आहे. तर 2019 मध्ये 11 कोटी 66 लाख कर्ज दाखविले होते. 


उमरगा- लोहारा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटातर्फे उभारलेले ज्ञानराज चौगुले यांनी आपल्या शपथपत्रात खालील प्रमाणे उल्लेख केला आहे.  यांचे शिक्षण एमए झाले असून, त्यांचा व्यवसाय शेती आहे. आमदार चौगुले यांच्या उत्पन्नात पाच वर्षात पाच पटीने वाढ झाली आहे. 2019-20 मध्ये 27.66 लाखांवरून चालू वर्षी 56.74 लाख रूपये आहे. मागील पाच वर्षात पत्नी व मुलांच्या उत्पन्नात 4.80 लाखांवरून 25.67 लाख वाढ झाली आहे. त्यांच्या कुटुंबाकडे रोख रक्कम 13 लाख 50 हजार दाखविण्यात आली आहे. मागील निवडणुकीत 10 लाख 50 हजार दाखविण्यात आले होते. चौगुले यांच्याकडे  सोने 10 तोळे, पत्नीकडे 45 तोळे व दीड किलो चांदी तर मुलांकडे 16 तोळे सोने एकूण किंमत 58 लाख 40 हजार एवढ्या किंमतीचे आहे.  मागील वर्षी पती-पत्नीकडे एकूण 45 तोळे सोने होते. चौगुले यांनी आपल्या शपथपत्रात 20 लाखाची फोर्ड, ट्रॅक्टर व बुलेट दाखविली आहे. तर मागील निवडणुकीत इनोव्हा व बुलेट दाखविली होती.  चौगुले यांच्यावर 1 कोटी 4 लाख व पत्नीच्या नावे 1 कोटी 82 लाख तर मुलांच्या नावे 24 लाख 98 हजारांचे कर्ज दाखविले आहे. चौगुले यांनी 1 कोटी 33 लाख, पत्नीच्या नावे 1 कोटी 44 लाख व मुलांच्या नावे 1 कोटी 16 लाख रूपयांची जंगम मालमत्ता दाखविली आहे. तर 2019 मध्ये 1 कोटी 27 लाख, पत्नी 12 लाख 87 हजार व  मुलांच्या नावे 4 लाख 50 हजार रूपयांची जंगम मालमत्ता दाखविण्यात आली होती. चौगुले यांनी 1 कोटी 65 लाख, पत्नीच्या नावे 1 कोटी, मुलांच्या नावे 83 लाख रूपये रूपयांची स्थावर मालमत्ता दाखविली आहे. पालकमंत्री सावंत यांच्या कुटुंबावर 17 कोटींचे तर आमदार चौगुलेंकडे चार कोटींचे कर्ज आहे.

 
Top