तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवात खाचखळगे भरण्यासाठी मुरमाचा वापर करण्या ऐवजी मोठ्या दगडाचा वापर केला गेल्यामुळे पायी चालत येणाऱ्या भाविकांना याचा ञास सहन करावा लागला.
श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सव काळात पावसामुळे खचखळगे भरल्याने शहरातील साईट पट्यावर खड्डे पडले होते. शारदीय नवराञ उत्सव काळात पायी चालत येणाऱ्या भाविकांना याचा ञास सहन होवू नये म्हणून नगर परिषदेच्यावतीने तिर्थक्षेञ तुळजापूरकडे येणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या साईड पट्यांवर मुरूम टाकण्या ऐवजी मोठ मोठे दगडगोठे ठाकल्याने याचा ञास पायी चालत येणाऱ्यांना सहन करावा लागला. पाऊस पडुन ही हे दगड अजुन ही तसेच असल्याने मुरुम ऐवजी दगडगोठे टाकुन मुरुम टाकल्याचे दाखवून बिले काढण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. नळदुर्ग रोड साईट पट्या मोतीझरा सह अनेक भागात मुरमाऐवजी दगड टाकले गेले आहेत. तरी या प्रकरणाची चौकशी करुन तपासणी अंती बील अदा करावेत व ज्यांनी राँयल्टी भरली आहे. त्याचेच बिले काढावेत अशी मागणी होत आहे.