धाराशिव (प्रतिनिधी)- परंडा-भूम मतदार संघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला ही जागा सुटते की, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ही जागा सुटते या विषयी बरीच चर्चा होती. परंतु वाटाघाटीमध्ये याचा मार्ग निघाला असून शेवटी परंडा-भूम मतदार संघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून माजी आमदार कै. ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. 

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रणजीत पाटील यांना एबी फॉर्म दिला आहे. परंडा भूम मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे हे या मतदारसंघातून इच्छुक होते. त्यांनी तसा प्रचारही चालू केला होता. परंतु महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ कोणत्या घटक पक्षाला सुटेल याबाबत निश्चितता नव्हती. वाटाघाटी नंतर हा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे सुटल्याने माजी आमदार कै. ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव रणजीत पाटील यांना उमेदवार मिळाली आहे.

आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याविरुद्ध रणजीत पाटील हा नवखा तरुण आहे. दिवंगत ज्ञानेश्वर पाटील हे या मतदारसंघाचे दोन वेळा आमदार राहिल्यामुळे त्यांचा जनसंपर्क या मतदारसंघात दांडगा होता. तसेच परांडा भूम हा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यांचा लाभ रणजित पाटील यांना होण्याची शक्तया आहे. 

 
Top