धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे  यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 2024 विधानसभा निवडणूक अनुषंगाने  सविस्तर चर्चा बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत विविध पदाधिकारी तसेच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

या बैठकीमध्ये धाराशिव उस्मानाबाद - कळंब विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सोडवून घेण्याचा एकमुखी ठराव एक मताने संमत करण्यात आला. व सर्व ताकदीनिशी लढू व जिंकू असा विश्वास उपस्थितीत  पदाधिकारी यांनी दाखविला. ही बैठक मोठया उत्साहात व खेळी मेळीच्या वातावरणात यशस्वी झाली.राष्ट्रपतींच्या हस्ते  मराठवाडा शिक्षक आमदार विक्रमकाळे यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हाकार्याध्यक्ष ॲड.प्रवीण यादव, तुळजापूर विधानसभा अध्यक्ष मलंग शेख,भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष  नवनाथ आप्पा जगताप,धाराशिव कळम विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे, धाराशिव तालुकाध्यक्ष  प्रशांत फंड, तुळजापूर तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी,परंडा तालुकाध्यक्ष अमोल काळे, कळम तालुका अध्यक्ष शिवाजीराव लकडे,भूम तालुकाध्यक्ष ॲड.रामराजे साळुंखे,वाशी ता.अध्यक्ष सूर्यकांत सांडसे,नंदकुमार गवारे,धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे,तुळजापूर शहराध्यक्ष महेश चोपदार,बेंबळी शहराध्यक्ष अतिष मर्गणे,नळदुर्ग शहराध्यक्ष  अजित अण्णा जुनैदी,सामाजिक न्याय प्रदेश सरचिटणीस सचिन सरवदे, सामाजिक न्याय मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष विवेकानंद साळवे,युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा सरला खोसे,सेवादल सेल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव तसेच  जिल्हातील सर्व प्रमुख पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी, सर्व प्रदेश पदाधिकारी, सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी, सर्व शहराध्यक्ष व पदाधिकारी, सर्व फ्रंटल सेल जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top