धाराशिव (प्रतिनिधी)- तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा या एकलव्य आश्रम शाळा मंगरूळ यमगरवाडी तालुका तुळजापूर येथे दिनांक पाच व सहा ऑक्टोंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.

मुला मुलींच्या स्वतंत्र स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे व अण्णासाहेब कोल्हटकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी तालुका क्रीडा संयोजक राजेश बिलकुले किडा मार्गदर्शक इसाक पटेल बालाजी शिरसागर, माऊली भुतेकर, गीते , महादेव माळी, घोडके मॅडम,राऊत गोळ, दत्तात्रय घेवारे, ढुरे, राठोड, गोविंद सोमाणी, रामचंद्र खडके, आधटराव, राहुल जाधव, यशवंत निंबाळकर, खंडू काळे, साखरे  तसेच तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक उपस्थित होते. त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते जिल्हा युवा मिळाल्यामुळे ज्ञानेश्वर भुतेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.दोन दिवस संपन्न झालेल्या या स्पर्धेत सहाशे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते.

 
Top