तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या अश्विनी पोर्णिमा निमित्ताने पायी वारी पुर्ण करणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी शासन कोट्यावधी रुपये याञा अनुदान देते. माञ यावर ही ठेकेदार माध्यमातून थातुर मातुर सोयीसुविधा देवुन मलिदा खाण्याचा घृणास्पद घडत असल्याने या याञा अनुदान माध्यमातून केलेल्या कामांची सीसीटीव्ही चिञण माध्यमातून तपासणी करण्याची मागणी ञस्त भाविकांतून होत आहे. श्रीतुळजाभवानी याञा अनुदानावर डल्ला मारणारी मोठी टोळी गेली अनेक वर्ष काम करीत असुन, याला त्या त्या विभागाचे अधिकारी, कर्मचारी वर्गाचे सहकार्य असल्याचे दिसुन येत आहे. यंदाचा ही याञा पायी वारी भाविकांसाठी कष्टदायक तर ठेकेदार, संबंधित शासकीय अधिकारी, कर्मचारी वर्गासाठी लाभदायक ठरत असल्याचे दिसुन येत आहे.
तिर्थक्षेञ तुळजापूर येथील श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञोत्सवात जिथे आवश्यक आहे गर्दी आहे तिथे बँरेकटींग लावलेले नाहीत. फक्त मुख्य रस्त्यावर अधिकारी वर्गाच्या ठिकाणी लाकडी, लोंखडी बँरेकटींग लावले आहेत. लोखंडी बँरेकटींग व्यवस्थित बांधणी न केल्याने ते वेडे वाकडे होवुन कलुन त्याला थडकुन भाविक जखमी होत आहेत. बँरेकेटींग तकलीद असुन बिले काढण्यापुरते दिखाव्यासाठी बँरेकेटींग लावल्याचे चिञ दिसत आहे. अनेक ठिकाणी बँरेकेटींग लावले नसल्याचे दिसुन येत आहेत.
फक्त जिल्हाधिकारी फिरतात तिथे बँरेकेटींग, उर्वरीत ठिकाणी माञ बँरकेटींग लावल्याचा दिखावा केला गेल्याचे दिसुन येत आहे. जिथे आवश्यकता आहे तिथे बँरेकटींग नाही. बँरकेंटींग खोदुन लावण्या ऐवजी लाकड तसेच उभे केले आहे. या बँरेकटींग फायद्या ऐवजी भाविकांना जखमी करणाऱ्या आहे. नियमानुसार बँरेकेटींग लावल्या नाहीत. लावलेल्या बँरेकेटींगचे सीसीटीव्ही चिञण करुन त्याचे बिल अदा करण्याची मागणी होत आहे.
तात्पुरते शौचालय बाबतीत ही अशीच परिस्थिती आहे. हे शौचालय घाण असल्याने भाविक याचा वापर न करता उघड्यावर शौचास जात आहे. येथे टपात पाणी कमी भरतात ते खोल जाताच पाणी घेता येत नाही. बहुंताशी ठिकाणी अशीच परिस्थिती आहे.
घाटशिळ रोडवर असलेल्या दर्शन मंडपात प्रवेश करताना मुरुम टाकणे गरजेचे असताना तिथे कचकच टाकल्याने पायी चालत येणाऱ्या भाविकांना पायाला कचकडी टोचुन पाय रक्तबंबाळ होत आहेत. कचकडी प्रकरणाची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. घाटशिळ रोड दर्शन मंडपात कुंभार गल्लीतुन जाणाऱ्या भाविकांना पञ्याचे बाह्य टोक लागुन जखमी होत आहेत. तसे आतील दगड उघड पडल्याने यामंडपातुन जाताना पायाला दगड टोचत असल्याने जेवडे पायी चालताना ञास झाला नाही तेवढा दर्शन मंडपातुन मार्गक्रमण करताना होत आहे.