तुळजापूर (प्रतिनिधी)- प्रतीवर्षा प्रमाणे अश्विनी पौर्णिमे निमित्त जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मौनक घोष, अप्पर जिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी धाराशिव येथून पायी चालत येवुन देविचरणी आपली पायी वारी सेवा अर्पण केली. तिर्थक्षेञ तुळजापूर येथे त्यांचे आगमन होताच पालिकेच्यावतीने शाल, कवड्याची माळ घालुन घालुन फेटा, बुके देवुन मान्यवरांचे स्वागत मुख्याधिकारी नगरपरिषद तुळजापूर लक्ष्मण कुंभार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता.