तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा येथे ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती वाचन प्रेरणा दिनानिमित्त प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन कडून वाचन स्पर्धा घेण्यात आली.
धनश्री मगर,समृद्धी पवार, अनुष्का भातभागे,सृष्टी नाईकवाडी, आचल देवकुळे,वैष्णवी कावळे या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुरेखा कदम यांच्या हस्ते प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनने प्रमाणपत्र व अवांतर वाचनाची पुस्तके देवून गौरविण्यात आले. यावेळी प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन तालुका प्रमुख मनोज राठोड, प्रतिभा जोगदंड, मालोजी वाघमारे,काशिनाथ नरसाळे, पल्लवी पवार, ज्योती गाढवे, किरण फंड उपस्थित होते.