तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील जागजी येथील श्री महालक्ष्मी मंदिरारील शिखरावर झाडाचे साम्राज्य वाढल्याने शिखराला भेगा पडल्या असून शिखर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

धाराशिव तालुक्यातील जागजी येथे उत्तर चालुक्यांच्या आधिचे असलेले श्री महालक्ष्मी मंदिर असून दगडी मंदिरावर असलेले विटांनी बांधलेले शिखर आहे.हे शिखर नागरशैलित मोडणारे आहे.महालक्ष्मी मंदिर पश्चिमाभिमुख असून ते एक मिटर उंच अधिष्ठानावर उभे आहे.मंदिराचे गर्भगृह 4 मिटर बाय चार मिटर आहे.संपूर्णपणे विटांनी बांधलेल्या या शिखरावर कांही नक्षी आहेत.यामध्ये कांहीं अलंकृत विटाही आहेत.मंदिराच्या पायापासून निघणाऱ्या रेषा थेट शिखराच्या वरपर्यंत मिळतात.शिखरावर लहान लहान शिखराच्या प्रतिकृती आहेत.कूटशाळा प्रकारात मोडणारे हे शिखर 14 मिटर उंच आहे.याच मंदिराच्या शिखरावर मोठ मोठी झाडे उगवलेली असून या झाडांमुळे शिखराला भेगाही पडलेल्या आहेत.हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येते.पुरातत्व विभागाच्या वरीष्ठानी याबाबतीत लक्ष घालून वेळीच शिखरावर उगवलेली झाडे काढली नाहीत तर विटांनी बांधलेले शिखर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 
Top