नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नातुन उभारण्यात येत असलेल्या भव्य, दिव्य अशा राज्यातील पहिल्या “बसवश्रुष्टी“ च्या पहिल्या टप्प्याचा स्तंभ पुजनाचा कार्यक्रम दि. 22 ऑक्टोबर रोजी नळदुर्ग येथील गोलाई चौकात मोठ्या उत्साहात व शेकडो वीरशैव समाज बांधव व इतर नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या अथक प्रयत्नानंतर राज्य सरकारने नळदुर्ग येथे भव्य अशी बसवश्रुष्टी उभारण्यास मान्यता दिली आहे. यासाठी लागणारी जमीन व निधी राज्यसरकारकडुन उपलब्ध झाला आहे. या बसवसृष्टीमुळे ऐतिहासिक नळदुर्ग शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे. त्याचबरोबर याठिकाणी उभारण्यात येणारी भव्य, दिव्य बसवसृष्टी ही राज्यातील पहिली बसवसृष्टी आहे. त्यामुळे तुळजापुर तालुक्यातील वीरशैव समाज बांधवानी समाधान व्यक्त केले आहे.
बसवसृष्टी उभारण्याच्या कामाचा पहिला टप्पा म्हणुन नळदुर्ग येथील गोलाई चौकात दि. 22 ऑक्टोबर रोजी स्तंभ पुजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. प्रारंभी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर वीरशैव समाज बांधवांच्या हस्ते स्तंभ पुजन करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपचे सुशांत भुमकर, माजी नगरसेवक संजय बताले, बसवराज धरणे, नय्यर जहागिरदार, शफीभाई शेख, दत्तात्रय कोरे, सुधीर हजारे,तुळजापुर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. आशिष सोनटक्के, माजी जि. प. सदस्य ऍड. दीपक आलुरे, वसंत वडगावे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सिद्धेश्वर कोरे, दयानंद मुडके, सोमनाथ शेटे, दहिटण्याचे सरपंच पप्पु पाटील, व्यापारी मंडळाचे सुभाष कोरे, दयानंद स्वामी, खोबरे गुरुजी, नळदुर्ग शहर भाजपचे अध्यक्ष धीमाजी घुगे, भाजपचे तालुका सरचिटणीस श्रमिक पोतदार, माजी शहर अध्यक्ष पद्माकर घोडके, सिंदगावचे सरपंच विवेकानंद मेलगिरी, माजी पंचायत समितीचे सदस्य साहेबराव घुगे, होर्टीचे महादेव पाटील,शिवसेनेचे बंडप्पा कसेकर, भाजपचे संजय विठ्ठल जाधव यांच्यासह नळदुर्ग, लोहगाव, खुदावाडी, अणदुर, होर्टी, सिंदगाव, बोळेगाव, खानापुर यासह परीसरातील गावांतील वीरशैव समाज बांधव व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.