धाराशिव (प्रतिनिधी)- श्री सिध्दीविनायक परिवारातील दोन्ही कारखान्यांचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा आज मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

श्री सिध्दीविनायक परिवारातील श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज प्रा. लि व श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लि. हे दोन्ही कारखाने येत्या गाळप हंगामासाठी सज्ज झाले आहेत. या दोन्ही कारखान्यांचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा आज विधान परिषदेचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी श्री सिध्दीविनायकचे व्यवस्थापन कौतुकास्पद असल्याचा उल्लेख ठाकूर यांनी केला.

यावेळी आपल्या प्रास्ताविक पर भाषणामध्ये परिवाराचे संस्थापक दत्ता कुलकर्णी यांनी येता गळीत हंगाम कसा असेल याबद्दल माहिती दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या कारखान्याला ऊस घालण्याबद्दल आवाहन माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केला. तसेच दत्ता कुलकर्णी यांचा श्री सिध्दीविनायक परिवार हा मराठवाड्यासह महाराष्ट्रात नाव लौकिक करेल असे पण त्यांनी सांगीतले.

या कार्यक्रमास खामसवाडी गावचे सरपंच अमोल पाटील, अशोक शेळके, तेरणा कारखान्याचे माजी संचालक दिलीप पाटील, ग्राम पंचायत सदस्य दयानंद पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब पाटील, ॲड. नितीन भोसले, बालाजी कोरे, गणेश कामटे, दिनेश कुलकर्णी, राजकुमार जाधव, अरविंद गोरे, धनंजय गुंड, हनुमंत कुलकर्णी, मंगेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. प्रतिक देवळे यांनी केले.


 
Top