तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील सहशिक्षक सतिश बळवंतराव यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.                

श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी चा कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे गुणवंत शिक्षक पुरस्कार तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील सहशिक्षक सतिश बळवंतराव यांना मिळाल्याबद्दल शालेय व्यवस्थापन  समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अविनाश पाडुळे, किरण आबदरे, साहेबराव मेटे, अनिल टेळे, बालाजी शेंडगे, मुख्याध्यापक जे. के. बेंद्रे, पर्यवेक्षक एस.एस.पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top