तुळजापूर (प्रतिनिधी) - जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर या ठिकाणी आयोजित केलेल्या विभागीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत 17 वर्षे वयोगटात मुलींमध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूलची विद्यार्थिनी शुभांगी लिंबराज नन्नवरे हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
या स्पर्धेत लातूर, नांदेड, उस्मानाबाद या जिल्ह्यातून 70 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी तिला तिचे पालक लिंबराज नन्नवरे, त्यांचा मित्रपरिवार, तसेच सॉफ्ट टेनिस मार्गदर्शक, विद्यालयाचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.