भूम (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाच्या भूम, परंडा व वाशी समन्वयकपदी बाळासाहेब क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब क्षीरसागर यांनी परंडा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे काम तळगाळापर्यंत पोचवले असून, त्यांनी कार्यकर्त्यांची शिरसागर फळी निर्माण केली आहे. त्यामुळे पक्षाने त्यांची भूम, परंडा, वाशी तालुक्याच्या सन्मवयकपदी निवड केली आहे. या निवडीबद्दल भाजप कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला.

 
Top