धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सकपदी नुकतेच पदभार स्विकारणारे जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकुरकर यांचा सत्कार रुग्ण कल्याण समिती व ईथीकल कमिटी व नेत्र विभागाच्यावतीने करण्यात आला. याच बरोबर माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ईस्माईल मुल्ला यांचाही सत्कार करण्यात आला.
सध्या भारतीय संविधानाचा अमृतमहोत्सवी वर्ष चालु असुन मतदार जनजागरण समितीच्या वतीने भारतीय संविधानाचा गौरव म्हणुन भारतीय संविधान उद्देशिकाची व व्याख्या विश्लेषणाची प्रत देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय इथिकल कमिटी सदस्य गणेश वाघमारे,आरोग्य मित्र शेख रऊफ ब्रदर, पत्रकार श्रीकांत मटकीवाले, माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ईस्माईल मुल्ला, उप अधीक्षक डॉ. तानाजी लाकाळ, बालरोग तज्ञ डॉ. नितीन भोसले, नेत्र तज्ञ डॉ. बाळासाहेब घाडगे, डॉ.महेश पाटील, डॉ.निलेश कुरील, इन्चार्ज रेखा लोंढे,परिचारिका सुनीता गोरे, परिचारिका वहिदा शेख, जाधव व इतर वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.