धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात 4 विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये 240 - उमरगा,241 - तुळजापूर,242 - उस्मानाबाद आणि 243 -परंडा विधानसभा मतदारसंघ येतात.आज मंगळवारी 22 ऑक्टोबर रोजी पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला नाही.
आज 22 ऑक्टोबर रोजी 99 इच्छूक उमेदवारांनी 214 अर्ज खरेदी केले. यामध्ये उमरगा विधानसभा मतदारसंघासाठी 19 व्यक्तींनी 35 अर्ज,तुळजापूर मतदारसंघासाठी 28 व्यक्तींनी 73 अर्ज,उस्मानाबाद मतदारसंघासाठी 27 व्यक्तींनी 52 अर्ज आणि परंडा विधानसभा मतदारसंघासाठी 25 व्यक्तींनी 54 अर्जाची खरेदी केली. यामध्ये माजी आमदार मधुकरराव चव्हाण, राहुल मोटे, आमदार विक्रम काळे, ज्ञानराज चौगुले, प्रशांत चेडे, डॉ. राहुल घुले, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील, मकरंद राजेनिंबाळकर, देवानंद रोचकरी, शिवाजी कापसे आदींचा उमेदवारी अर्ज खरेदी करण्यामध्ये समावशे आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.- अधिसूचना जाहीर करणे - 22 ऑक्टोबर, नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख - 29 ऑक्टोबर,नामांकनाची छाननी -30 ऑक्टोबर, नामांकन मागे घेण्याची अंतीम तारीख - 4 नोव्हेंबर, मतदान तारीख - 20 नोव्हेंबर आणि मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे.