कळंब (प्रतिनिधी)- आजच्या जमान्या मध्ये वस्तु पासुन पैशापर्यत काहीही सापडले तर परत देणे बातच नाही पण जरी चूकून कोनी पाहिलेच तरी खोटे बोल पण रेटून बोल अशी गत आज मानसाची झाली आहे पण येथील आगारातील चालक तथा वाहन परीक्षक डी. एम. मुंडे हे बसक्र 20 2029 ही बस सोलापूर ते कळंबला येण्यासाठी दि. 17 ऑक्टोबर रोजी रात्री कळंब आगारात आठ वाजता आली. या बसमध्ये अनेक प्रवाशी प्रवास करत असतांना धाराशिव येथीलकापड व्यापारी प्रदिप रोडिडा या बसमध्ये धाराशिवला येण्यासाठी बसले होते. ही बस धाराशिव स्थानकात आली व गाडीतून उतरताना खिशातील मोबाईल बस मध्येच पडला. हा मोबाईल जवळपास 20 हजाराचा किमतीचा होता. या बसमध्ये पडला होता. ही बस रात्री कळंब स्थानकात आली. तेव्हा चालक जमा करू निघून गेले. यानंतर ही बस वाहन परीक्षक दत्ता मुंडे यांनी तपासणीसाठी घेतली असता त्यात हा मोबाईल आढळून आला. या मोबाईल वरती फोन आल्यावर त्यांनी संबंधित व्यक्तीला हा मोबाईल कळंब स्थानात आहे. आपण घेऊन जावा असे सांगून मोबाईल ठेवला. दि. 18 ऑक्टोबर रोजी प्रदिप रोडिडा हे धाराशिवहून आले. यावेळी आगार प्रमुख एस. डी. खताळ यांनी वाहन परीक्षक दत्ता मुंडे यांना संबंधित मोबाईल परत करण्याच्या सूचना दिल्या. त्यावरून त्यांनी संबंधित कापड व्यापारी यांना हा मोबाईल चालक ए. जे. शेख, वाहक गणेश काळे, चालक बाबा धावारे, गणेश वाघमारे, वाहतूक नियंत्रक नाना नानजकर, चालक वसंत गंभीरे, सुरक्षा रक्षका समक्ष वाहन परीक्षक दत्ता मुंडे यांनी हा मोबाईल संबंधित व्यापाऱ्याला दिल्याने व्यापाऱ्याने त्यांचे कौतुक केले.