कळंब (प्रतिनिधी)-शेगाव जिल्हा बुलढाणा येथे दिनांक 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय आट्यापाट्या ज्युनिअर स्पर्धेसाठी धाराशिव जिल्हा संघ आज  संध्याकाळी कळंब  येथून रवाना झाला सदरील संघ पुढीलप्रमाणे मुलांचा संघ:-आदित्य माळकर, रोहन घाडगे, आर्यन झाडके, शिवम डोंगरे, प्रतीक विरगट ,समर्थ झाडके, प्रवीण पाटील, अजय शिंदे, आर्यन कस्पटे, दयानंद पांढरे, ऋषिकेश माळकर, आदित्य शिंदे मुलांच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून दीपक शिंदे तर व्यवस्थापक म्हणून तुषार डोंगरे यांची निवड करण्यात आली.

मुलींचा संघ:- आदिती राऊत, श्वेता मगर, साक्षी काटे, समृद्धी कांबळे, सिद्धी अभंग, संस्कृती गव्हार, सिद्धी डोंगरे, प्रतीक्षा माळी, संध्या डोंगरे, संचिता यादव, प्रांजली भराटे, सायली म्हेत्रे, मुलींच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून प्रीती शिंदे तर व्यवस्थापक म्हणून शितल शिंदे यांची नेमणूक करण्यात आली 

सदरील मुलांच्या व मुलींच्या दोन्ही संघाला आट्यापाट्याची राष्ट्रीय खेळाडू शिल्पा डोंगरे पोस्टमन पुणे विभाग यांनी सर्व खेळाडूंना किट (खेळाडूंचा पोशाख) देऊन सन्मानित केले या संघाला पुढील  स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा आट्यापाट्या संघटनेचे अध्यक्ष तथा शिवछत्रपती पुरस्कारार्थी  राजकुमार सोमवंशी सचिव तथा राज्य संघटनेचे सहसचिव शरद गव्हार सल्लागार संजय घुले बाळकृष्ण भवर, मार्गदर्शक अनिल शिंदे, राजाभाऊ शिंदे, अशोक आसबे, उत्तरेश्वर गायकवाड, परमेश्वर मोरे, भैरवनाथ राऊत, सौरभ शिंदे, निलेश माळी, सरस्वती वायबसे, मीनाक्षी शिंदे, प्रतिभा गांगर्डे, सुनंदा चव्हाण, व इतर जिल्ह्यातील सर्व क्रीडा प्रेमी यांनी खेळाडूंना शुभेच्छा देऊन शुभाशीर्वाद दिले.

 
Top