तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृह असावे ही संकल्पना माझी असुन यातुन अनेक जिल्हयात सांस्कृतिक सभागृह उदघाटने झाले पण चोराखळीचे सभागृह काम पुर्ण होवुन ही का उदघाटन केले जात नाही असा सवाल डाँ. स्नेहा सोनकाटे यांनी पञकारांशी संवाद साधताना केला.
यावेळी बोलताना म्हणाल्या कि, माझे गुरु खा. डाँ विकास महात्मे माध्यमातून मी राज्यात 150 कोटी निधी आणला. आरेवाडी व चोराखळी सांस्कृतिक सभागृह श्रेयवादामुळे रखडवले गेल्याचा आरोप यावेळी केला. मी राज्यासाठी 150 कोटी निधी आणला पण सत्कार करुन घेतला नाही. माञ 1 कोटी निधी आश्वासन देवुन समाजाचा तोंडाला पाणी पुसल्याचे स्पष्ट करुन धनगर समाजाकडुन सत्कार करुन घेतला. याला काय म्हणावे हे आता तालुकावासियांनीच ठरवावे असे यावेळी स्पष्ट केले .
तालुक्यात सर्वञ दारुचा सुळसुळाट आहे. याचा सर्वाधिक ञास महिलांना होत असल्याने या तालुक्यात दारुबंदी होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. या तालुक्यात एक तरी काम दाखवा ते पुर्ण केले असे आवाहन देवुन काम न करता फक्त उदघाटने करुन कामाचे श्रेय घेण्याची धडपड माञ लोकप्रतिनिधी करीत असल्याचे यावेळी म्हणाल्या. या तालुक्यात जातपातीला स्थान नाही. स्ञीशक्ती देवता श्रीतुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पुनित झालेल्या तुळजापूर विधानसभा मतदार संघाचा लोकप्रतिनिधी उच्चशिक्षित महिला का असु नये याचा विचार करुन मी याच तालुक्यातील सिंदगावची असल्याने मला संधी द्यावे असे शेवटी म्हणाल्या. या वेळी डॉ. नितीन ढेपे, मिलींद रोकडे कदम आदी उपस्थितीत होते.