धाराशिव  (प्रतिनिधी)-  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 करीता भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक (खर्च) अलुरू व्यंकट राव (खठड) यांचे आज 22 ऑक्टोबर रोजी जिल्हयात आगमन झाले.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

राव यांचा मुक्काम व कार्यालय शासकीय विश्रामगृह, शिंगोली येथील अजंठा या सूटमध्ये आहे.त्यांच्या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02472 - 235470 असा असून त्यांचा भ्रमणध्वनी 9021524212 हा आहे. निवडणूक निरीक्षक (खर्च) यांच्याशी निवडणूक विषयक प्रश्नाबाबत भेटीची वेळ ही सकाळी 10.00 ते 11.00 दरम्यानची निश्चित केली आहे.

 
Top