धाराशिव (प्रतिनिधी)- मुरुम पोलीस ठाण्याचे पथक हे पोलीस ठाणे हद्दीत कोथळी बेळंब जाणारे रोडवर पुलाच्याजवळ नाका बंदीस असताना पथकास गुप्त बातमी मिळाली की, एक पांढऱ्या रंगाची स्वीप्ट डिझायर वाहनामध्ये अवैध गुटखा वाहतुक करीत आहे. त्यावर पथकाने स्वीप्ट डिझायर गाडी क्र एमएच 01 बी.टी.6144 थांबवून चेक केले. त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा मिळून आला. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर वाहनाचा चालक विचारले असता त्यांने त्याचे नाव शेख तौफीक गणी शेख, वय 31 वर्षे, रा. अजमेर नगर बालेपीर नगर रोड बीड ता. जि. बीड असे सागिंतले. त्यावर पथकाने सदर स्वीप्ट कार व त्यातील मिळून आलेला  हिरा पान मसाला 10 पोते, रॉयल 717 तंबाखुनावाचे एकुण 200 पॉकेट अंदाजे 3 लाख रूपये किंमतीचा सह  स्वीप्ट डिझायर गाडी क्र एमएच 01 बी.टी.6144 असा एकुण 9 लाख रूपये किंमतीचा माल व आरोपी यास ताब्यात घेवून आरोपी याचे विरुध्द पोलीस ठाणे मुरुम येथे गुरनं 303/2024  भा.न्या. सं. कलम 223,274,275, 123 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास परि. पोलीस उप निरीक्षक गाडेकर करत आहे.

सदर कामगिरी ही पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार, मुरुम पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिफळे, परि पोउपनि गाडेकर, पोलीस अंमलदार तोरंबे, लोंढे,राठोड यांचे पथकाने केली.

 
Top