तेर( प्रतिनिधी)- श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांच्या वतीने देण्यात येणारा कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे गुणवंत शिक्षक पुरस्कार तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील सहशिक्षक सतिश बळवंतराव यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर. विभागीय मंडळ लातूरचे विभागीय अध्यक्ष सुधाकर तेलंग, शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष  नंदनजी जगदाळे, सचिव  पी. टी. पाटील, खजिनदार जे. सी. शितोळे, सहसचिव ऐ.पी.  देबडवार यांच्या हस्ते देण्यात आला. 

हा पुरस्कार देताना आपण संस्थेत अध्यापनाचे  कर्तव्य निष्ठेने करत आहात. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभागी होऊन कर्मवीरांच्या विचारांचा वारसा चालवत आहात. तसेच गुणवत्ता पूर्ण विद्यार्थी व संस्कारक्षम पिढी घडविण्यात आपले उल्लेखनीय योगदान आहे. आपले विद्यार्थी व समाजाप्रती असलेले कर्तव्य तत्पता व सामाजिक बांधिलकी लक्षात ठेवून आपल्याला शैक्षणिक वर्ष 2024 -25 करता माध्यमिक विभागातून आपणास कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

 
Top