धाराशिव (प्रतिनिधी)- दि 15 ऑक्टोंबर म्हणजेच जागतिक धुवा दिनया दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुद्रवाडी येथे विद्यार्थ्यांच्या अंगी स्वच्छतेच्या सवयी लागाव्यात, विद्यार्थ्यांना आपल्या शरीराची समज व शरीर संवर्धनाचे महत्व आणि आरोग्याची सुयोग्य काळजी घेण्यासाठी जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला.
माझे आरोग्य- माझी जबाबदारी नवोपक्रमांतर्गत रुद्रवाडी शाळेत अनोखा नवोपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी हात धुण्याचे महत्व आणि हात न धुतल्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना समाजावून सांगून विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक संतुलन व शारीरिक स्वच्छतेचे महत्त्व, आरोग्याच्या चांगल्या सवयी, ज्ञानेंद्रिया ओळख व आपल्या संपूर्ण शरीराविषयी सखोल माहिती शाळेचे मुख्याध्यापक गोविंद घारगे यांनी दिली. हात धुण्याच्या विविध पद्धती विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आल्या. यावेळी रेणुका जांभळे यांनी एक बडबडगीत सादर करून विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक पद्धतीने हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. आपल्या आरोग्याच्या चांगल्या सवयी समजावून सांगितल्या. हात धुण्यासाठी वापरण्यात येणारे विविध साधने, पाणी यांचा सर्वागीण उपयोग सांगण्यात आला. यावेळी गावातील अंगणवाडी विमल गायकवाड, माता पालक संघाचे अध्यक्ष कल्पना शिंदे व उमेदच्या कार्यकर्ती कविता भोसले उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार निर्मला झुंजारे यांनी केले.