धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर येथील श्री. तुळजाभवानी मातेचा नवरात्र उत्सव नुकताच सुरु झाला. यावेळी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नवरात्र उत्सवादरम्यान चोरी, जबरी चोरी इत्यादी गुन्ह्यांस आळा घालण्यासाठी व अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी तुळजापूर मंदीर परिसर व शहरात गस्तीस होते. दरम्यान पथकाने दि.03. 10.2024 रोजी तुळजापूर पो.ठा. येथे गुन्हा क्र.455/2024 भा.न्या.सं. कलम- 309(4) या जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्यावर पथकास मिळालेल्या माहिती वरुन मलबा हॉस्पीटल जवळ एक इसम दिसुन आला. त्याचेसोबत एक महिला यांना पथकाने ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नावे संदीप लहु पवार, वय 21 वर्षे व मंगल लहु पवार, वय 42 वर्षे दोघे रा. खर्डा ता. जामखेड जि. अहमदनगर असे सागिंतले. त्यावर पथकाने त्यांचेकडे सदर गुन्ह्या संदर्भात विचारपुस केली असता सदर इसमांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. यावरुन पथकाने त्यांचे ताब्यातुन गुन्ह्यातील रोख रक्कम हस्तगत करुन नमुद इसमांना पुढील कारवाई कामी तुळजापूर पोलीसांचे ताब्यात दिले. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम- 128 अंतर्गत 11 व्यक्तींविरुध्द कारवाई करण्यात आल्या आहे.

सदरची कामगीरी  पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि वासुदेव मोरे, सपोनि सचिन खटके, अमोल मोरे, पोलीस हावलदार विनोद जानराव, आश्विनकुमार जाधव, समाधान वाघमारे, पठाण, पोलीस नाईक नितीन जाधवर, मपोह शैला टेळे, मपोकॉ होळकर, चालक बोईनवाड, दहीहंडे  यांच्या पथकाने केली आहे.

 
Top