धाराशिव (प्रतिनिधी)-दि. 5 व 6 आक्टोबर शनिवार व रविवारी रोटरी क्लब धाराशिव व ओस्ला ओयासीस लेडीज फाउंडेशनच्या वतीने फक्त महिलांसाठी दांडिया नाईटचे आयोजन करण्यात आले आहे.समर्थ मंगल कार्यालय पवन राजे कॉम्प्लेक्स येथे संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत दांडिया नाईट रंगणार आहे.

यामधे ग्रुप दांडिया, दांडिया क्वीन, बेस्ट ड्रेसिंग, बेस्ट परफॉर्मन्स , बेस्ट स्टॅमिना अशा विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच लहान मुलींना बक्षिसे देण्यात येतील. तरी जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. श्रीराम जिंतूरकर, सचीव आनंद कुलकर्णी व ओस्ला ओयासीस लेडीज फाउंडेशन च्या डॉ. अनार साळुंके, किरण देशमाने, शशांकी संगवे व सुप्रिया दुधभाते यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

 
Top