उमरगा (प्रतिनिधी)- मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मंगळवारी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं रयत क्रांती सह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे सर्वच प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी शक्ती प्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज दाखल केले. माजी सभापती जितेंद्र शिंदे, भाजपचे माजी सभापती अभय चालुक्य, युवा सेना मराठवाडा निरिक्षक किरण गायकवाड,भाजपा तालुकाध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष हंसराज गायकवाड,युवती सेना मराठवाडा निरिक्षक आकांक्षा चौगुले, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ रयत क्रांती पक्षचे जिल्हाध्यक्ष सुरज आबाचने आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख उपस्थिती माजी खासदार रवींद्र गायकवाड, जितेंद्र शिंदे, किरण गायकवाड, आकांक्षाताई चौगुले, अभयराजे चालुक्य, हरीश डावरे, मदन पाटील, वैशालीताई खराडे, सुभाष सोनकांबळे यांची उपस्थिती होती. यावेळी सर्व प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले.